अनधिकृत बांधकामावरील कारवाईविरोधात टिटवाळ्यात स्थानिकांचा रेलरोको
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 19 Jan 2017 04:07 PM (IST)
कल्याण : टिटवाळा रेल्वे स्टेशनवर स्थानिक रहिवाशांनी रेल्वे रोको केला आहे. अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईला विरोध करत हा रेलरोको करण्यात आला. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणारी आणि मुंबईच्या दिशेने येणारे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून टिटवाळ्याच्या इंदिरानगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार होती. त्यासाठी पालिकेचं पथक इंदिरानगरमध्ये दाखलही झालं. मात्र स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध करत रेल्वे रोखून धरल्या आहेत. टिटवाळ्यात स्थानिकांच्या रेलरोकोमुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना या रेलरोकोमुळे फुकटच्या मनस्तापाला सामोरं जावं लागलंय.