आधार कार्डसाठी खारघरमध्ये मध्यरात्रीपासून रांगा
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2018 09:07 AM (IST)
नवी मुंबईतमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या आहेत. खारघर, वाशी परिसरातील सिंडिकेट बँकेसमोर आधार कार्ड काढण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या आहेत. खारघर, वाशी परिसरातील सिंडिकेट बँकेसमोर आधार कार्ड काढण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. खरं तर बँक सकाळी 10 वाजता बँक उघडते. मात्र, आपलं काम लवकर होण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे बँक एका दिवसाला फक्त तीस आधार कार्ड देत आहे. त्यामुळे लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आधार कार्डमध्ये होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सध्या बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येच आधार कार्ड मिळतं आहे.