मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात लोकलच्या दोन डब्यांमध्ये आग लागली होती. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.


शॉर्ट सर्किटमुळे लोकलच्या डब्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या 9.22 वाजताच्या लोकलमधून धूर येताना दिसल्यामुळे लोकल थांबवण्यात आली. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गाडी थांबवण्यात आली. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामागून येणाऱ्या टिटवाळा, बदलापूर, डोंबिवली लोकलचा खोळंबा झाला होता.



शॉर्ट सर्किटमुळे लोकलच्या डब्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.