मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले.
सफाई कामगार भरतीमध्ये दहावी पास असलेले उमेदवार असतात, मात्र त्यांना विचारलेले प्रश्न अत्यंत विनोदी होते, असल्याचं भाजप आमदार भाई गिरकर म्हणाले. गिरकरांनी विधानपरिषदेत यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर सभापतींनी चौकशी करण्याचे निर्देश दिले.
सफाई कामगार भरतीसाठी विचारलेले भन्नाट प्रश्न
1. भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?
2. 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?
3. फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात?
4. गायनेशियम म्हणजे काय?
5. लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते?
6. सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ?
7. निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे 2000 आणि 2750 गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी 12 महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये 12:11 या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती.
8. 72 कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी 6 सेकंदात 1 पोल ओलांडते. ही आगगाडी 480 मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते? BMC सफाई कामगार भरतीत भन्नाट प्रश्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2018 01:26 PM (IST)
सफाई कामगार भरतीमध्ये दहावी पास असलेले उमेदवार असतात, मात्र त्यांना विचारलेले प्रश्न अत्यंत विनोदी होते
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -