केईएम हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर कोसळले, दोन रुग्ण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2018 11:19 AM (IST)
केईएम हॉस्पिटलच्या छताच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागतील.
मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरील डायलिसिस विभागाच्या रुमच्या छताचे प्लास्टर कोसळले. काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. या दुर्घटनेत दोन रुग्णांना किरकोळ जखम झाली असून, त्यांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलचे दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत. छताच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.