मुंबई: राष्ट्रवादीच्या प्रफु्ल्ल पटेलांच्या टीकेला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाल्यांची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.


काँग्रेसमुळं राष्ट्रवादी बुडाली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या मागं चौकशीचा समेमीरा लावला अशी टीका प्रफुल पटेलांनी केली होती.

त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी जशास तसं उत्तर देत राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळं राष्ट्रावादी बुडाली काँग्रेसमुळं नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.