मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 16 Sep 2016 11:16 PM (IST)
नवी मुंबईः मराठा समाजाकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र मराठा समाजाच्या आक्रोशासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सैराट चित्रपटाला जबाबदार धरलं आहे. जातीच्या पलीकडे जाऊन तरूण संघटीत होत असल्याचं चित्र सैराटमध्ये दाखवलं आहे. त्याचाच राग मराठा समाजाच्या मनात खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली आहे. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.