छगन भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांची टीम आर्थर रोड जेलमध्ये दाखल
आर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, थोड्याच वेळात जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता
पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटाने उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 600 बालकांचे कुपोषणामुळे बळी: धनंजय मुंडे
- पंतप्रधान मोदी यांचा आज 66वा वाढदिवस, आईची भेट घेण्यासाठी मोदी गांधीनगरमध्ये दाखल
1. मराठा मोर्चात प्रस्थापित मराठा नेत्यांना स्थान नाही, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला, मराठा आरक्षणासाठी सरकार आग्रही
-------------------------------------
2. अवघ्या दोन दिवसात मराठवाड्यातल्या 3 वर्षाच्या दुष्काळाचं नामोनिशाण मिटलं, लातूर, उस्मानाबाद, नांदेडमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस
-------------------------------------
3. कुपोषणावर कुठलंही वादग्रस्त विधान केलं नाही, मुख्यमंत्र्यांनी हजेरी घेतल्यानंतर सवरांचं स्पष्टीकरण, कुपोषणामुळं 600 नव्हे 136 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा
-------------------------------------
4. काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येणार, क्राईम ब्रँचच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप
-------------------------------------
5. राजधानीत दलितांची स्वाभिमान संघर्ष रॅली, संसद मार्गावर गोरक्षक आणि मोदींविरोधात घोषणाबाजी, गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी
-------------------------------------
6. नागपूरमध्ये दारुड्याकडून वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण, कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे गंभीर जखमी, मेयो रुग्णालयात उपचार सुरु
-------------------------------------
7. नागपुरात सैराटफेम आर्चीच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची वीजचोरी, शॉक लागून तरुण गंभीर जखमी, पोलिसांकडून कुणावरही गुन्हा नाही
-------------------------------------
8. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 66वा वाढदिवस, गुजरातमध्ये कार्यक्रमांची रेलचेल, सूरतमध्ये 1 टन वजनाचा केक