मुंबई मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, प्रवाशांची पायपीट
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2017 02:19 PM (IST)
मुंबई : मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज दुपारी मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये घाटकोपर ते एअरपोर्ट रोडदरम्यान बिघाड झाला. यानंतर मेट्रोची वाहतूक थांबवण्यात आली. प्रवाशांना मधेच उतरवण्यात आलं. मेट्रोतील बिघाडामुळे प्रवाशांना नापक पायपीट करावी लागली आहे. दुपारी तासाभराच्या प्रयत्नानंतर मेट्रोची वाहतूक सुरु करण्यात आली. पण सध्या मेट्रोची वाहतूक घाटकोपर ते एअरपोर्टदरम्यान सुरु ठेवण्यात आली आहे. मेट्रो प्रशासनानं ट्विट करुन याची माहिती दिली आहे. दरम्यान वर्सोवा ते आझादनगर स्टेशनदरम्यान प्रवाशांना आपात्कालीन दरवाज्यातून उतरवण्यात आलं. याचे काही व्हिडीओ प्रवाशांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. ऐन कामाच्यादिवशी मेट्रोतील बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.