दक्षिण मुंबईत अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेतच, शिवाय खासगी बसगाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत मुंबईत प्रवेश करण्यास आणि मुंबईतून बाहेर जाण्यास खासगी प्रवासी बसेसना परवानगी नसेल. अवजड वाहनांवर हे निर्बंध आधीच लागू आहेत.
नव्या नियमांमुळे मुंबई सेंट्रल आणि परिसरातून खासगी ट्रॅव्हल्सने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.
दरम्यान, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या दूध टँकर, भाजीपाला, पाणी, पेट्रोल-डिझेल, रुग्णवाहिका यासारख्या वाहनांना वगळण्यात आलं आहे.
दक्षिण मुंबईत पार्किंगचा प्रश्न पूर्वीपासूनच आहे, पण यापुढेही गाड्या पार्क करताना काळजी घ्यावी लागेल. स्वत:च्या आणि पे अँड पार्कच्या जागेतच खासगी बस आणि अवजड वाहने पार्क करावे लागतील.
याशिवाय खासगी प्रवासी वाहतूक आणि अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत दिवसाही बंदी आहेच. सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत हे निर्बंध आहेत.
दक्षिण मुंबईत कधी कधी बंदी?
- सकाळी 8 ते 11 आणि संध्या 5 ते 9 पर्यंत खासगी बसेस, अवजड वाहतूक बंदी
- सकाळी 7 ते रात्री 12 अवजड वाहतूक बंदी
अवजड वाहनांना कुठपर्यंत प्रवेश?
- एन.एम.जोशी मार्गावर (डिलाईल रोड) आर्थर रोड नाक्यापर्यंत
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील के. शांताराम पुजारे चौकापर्यंत
- पी.डिमेलो रोडवरील मायलेट जक्शनपर्यंत
- डॉ.अॅनी बेझंट रोडवरील सेंच्युरी मिलपर्यंत
- सेनापती बापट मार्गावरील सर्व्हिस रोडवरील एल्फिन्स्टन जंक्शनपर्यंत, सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर प्रवेश बंदी मात्र राहील.
- बॅ.नाथ पै मार्ग, रे रोड आणि पी.डिमेलो मार्गावरून बाजूने रस्ते वापरून दक्षिण मुंबईत जाण्यास आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यावर धावण्यास निर्बंध असतील.