मुंबई : अग्निशमन दलाच्या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून काम बंद करण्याचा इशारा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.


कमला मिल आग प्रकरणानंतर अग्निशमन दलातील अनेक अधिकाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यांना सामोरे जावं लागतं आहे. त्याचप्रमाणे नवी तपासणी मोहीमसुद्धा अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरते आहे. तसेच अग्निशमन दलातील अनेक अधिकाऱ्यांचा कामाच्या स्वरुपाबाबत असंतोष आहे.



ड्युटीचे तास, प्रचंड तणाव, वाढीव कारकूनी काम यांबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या आयुक्तांसमोर ठेवल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नव्या अग्निप्रतिबंधक योजनेचं काम न करण्याचा इशारा दिला आहे.