मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. खासगी कॉलेजमधीलमेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, एमबीएसह सहा अभ्यासक्रमांची फी 20 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमधील तब्बल सहा हजार अभ्यासक्रमांची फी कमी होणार आहे.

राज्यभरातील सुमारे तीन हजार खासगी कॉलेजमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, एमसीए, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ, व्यवस्थापन अशा प्रकारचे सहा हजार अभ्यासक्रम सुरु आहेत. या अभ्यासक्रमांचं प्रथम वर्षाची वार्षिक फी भरमसाठ असते.

शिवाय प्रथम वर्षानंतर फीमध्ये एकूण फीच्या 5 ते 7 टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. यामुळेच राज्य सराकरने काही वर्षांपूर्वी खासगी कॉलेजमधील व्यावसायिक आणि इतर अभ्यासक्रमांची फी निश्चित करण्यासाठी शिक्षण शुल्क समिती स्थापन केली होती. तर मागील वर्षी या समितीत बदल करुन शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.

आता शुल्क नियामक प्राधिकरणाने खासगी कॉलेजमधील अभ्यासक्रमांची फी 20 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जर मागील वर्षी एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजची पहिल्या वर्षाची फी 1 लाख रुपये असतील, तर यंदापासून ही फी 80 हजार रुपये होईल.ीग