मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 28 Mar 2017 11:44 PM (IST)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचं सूचक मौन स्नेहभोजनाला दांडी मारण्याचे संकेत दर्शवत आहे. जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे नामकरण पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला, मात्र एनडीएच्या बैठकीला दिल्लीला जाणार का? या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली.