आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत? रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपतीतावडे-शेलारांनी विरोधी पक्षातील मराठा आमदार मॅनेज केले?
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2017 02:42 PM (IST)
राष्ट्रपती निवडणुकीत विरोधीपक्षाचे आमदार फोडण्यात भाजप नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत विरोधीपक्षाचे आमदार फोडण्यात भाजप नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विरोधीपक्षातील आमदारांची मतं फुटल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. भाजप आमदार आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा आमदारांना मॅनेज केल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांनी पुण्यातील एक आणि नगरमधील दोन विरोधी आमदारांना राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या बाजूने वळवल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. पुण्यात बैठक? राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी आमदार फोडण्यासाठी आशिष शेलार यांनी पुण्यात बैठक घेतली. आशिष शेलार यांनी पुण्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या चार आमदारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यांनी चार आमदारांना आपल्या बाजूने वळवलं, असं सांगण्यात येत आहे. सत्यजीत तांबेंचा दावा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार फुटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. “मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील 2 विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. धक्कादायक!”, असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं. विरोधकांच्या मतांचं गणित दुसरीकडे विरोधकांची मतं फुटल्यानं ते धास्तीत आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळून 6 मतं फुटलीत, तर इतर 8 विरोधकांनीही भाजपला मतदान केलं आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये नेमकी कुणाची मतं फुटली, याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मीरा कुमार यांना एकूण 77 मतं पडली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार संख्येवर नजर टाकल्यास, या दोन्ही पक्षांचे एकूण 83 आमदार आहेत. म्हणजे ही सगळी मतं मीरा कुमार यांना पडणं अपेक्षित होतं. दुसरीकडे एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, माकप, सपा या पक्षांची एकूण 5 मतं ही मीरा कुमार यांच्याकडे झुकली असण्याची शक्यता अधिक आहे. आता या पाच पक्षांची मतं मीरा कुमार यांना मिळाली असतील, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकूण 11 मतं फुटली असा त्याचा अर्थ निघतो. दरम्यान, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले आमदार रमेश कदम यांनी मतदानाच्या दिवशीच जाहीर केलं होतं की, ते रामनाथ कोविंद यांना मतदान करतील. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराने रामनाथ कोविंद यांना मत दिलं नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. संबंधित बातम्या राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे