कॉलेजच्या बाथरुमध्ये विद्यार्थिंनीचे व्हिडीओ काढण्याचे प्रयत्न, शिपायाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2017 10:44 AM (IST)
मुंबईतील विक्रोळीच्या एका नामांकित कॉलेजच्या बाथरुमध्ये विद्यार्थिंनीचे अश्लील व्हिडीओ क्लिप काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुंबई : विद्येचं मंदिर समजल्या जाणाऱ्या कॉलेजांमध्येही विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुंबईतील विक्रोळीच्या एका नामांकित कॉलेजच्या बाथरुमध्ये विद्यार्थिंनीचे अश्लील व्हिडीओ क्लिप काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी एका शाळेतील शिपायाला अटक करण्यात आली आहे. एका विद्यार्थिनीला बाथरुमच्या दारावर मोबाईल फोन आढळल्याने हा गैरप्रकार उघडकीस आला. यानंतर हा फोन विजय शिवतारे या शिपायाचा असल्याचं पोलिस तपासात पुढे आलं. पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र विद्येचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेतच असा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.