विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडे पोलिसांच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2016 07:29 PM (IST)
मुंबई: स्थानिक किक्रेटमध्ये धावांचा विश्वविक्रम करणाऱ्या कल्याणच्या प्रणव धनावडेला पोलिसांनी मारहाण केली आहे. कल्याणमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर येणार आहेत, त्यासाठी मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आला आहे. या हेलिपॅडला प्रणवने विरोध केल्यानं पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी प्रणवसह त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. या वर्षीच्या सुरुवातीला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात के.सी.गांधी शाळेच्या प्रणव धनावडेनं 1009 धावा केल्या होत्या. प्रणवने 327 चेंडूत 1009 धावा ठोकल्या. यात 59 षटकार आणि 129 चौकारांचा समावेश होता. दरम्यान, या प्रकारानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपण कार्यक्रमाला हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी कारने जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच खेळाच्या मैदानावर हेलपॅड योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.