रायगड : कर्जतजवळ रेल्वे इंजिनला वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचा पोल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे. या खोळंब्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस कर्जतमध्ये थांबल्या आहेत.
काल खंडाळ्याजवळील मंकी हिल परिसरात मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या.
पण आज अर्ध्या तासापूर्वी कर्जतजवळ रेल्वे इंजिनला वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचा पोल तुटल्याने मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रगती आणि डेक्कन एक्सप्रेस कर्जत स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.
सध्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु असून, लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असं मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. पण मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात प्रवाशांचा खोऴंबा झाला आहे.
म. रे.वर वाहतूक खोळंबा, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे कर्जतमध्ये थांबवल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2017 07:56 PM (IST)
रेल्वे इंजिनला वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचे पोल कर्जतजवळ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे . मध्य रेल्वेवरुन पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस कर्जतमध्ये थांबल्या आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -