बावनकुळे यांच्या मुलीचं 6 मार्चला नागपुरात लग्न आहे. याच लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ते आज मातोश्रीवर गेले होते.
मुंबईच्या महापौरपदावरुन सध्या भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये एकत्र येण्यासाठी साधी चर्चाही सुरु झालेली नाही.
त्यामुळं बावनकुळेंच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं तरी उद्धव ठाकरे भाजप नेत्यांसोबत बसतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यापूर्वी 24 फेब्रुवारीला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.