फेसबुकवरील मैत्री महागात, तरुणावर हत्यारानं वार
एबीपी माझा वेब टीम | 01 Mar 2017 03:44 PM (IST)
ठाणे: समलिंगी संबंधांसाठी बोलावलेल्या जोडगोळीनं केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ठाण्यातील तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित तरूण आणि आरोपींची फेसबुकवर मैत्री झाली होकी. पीडित तरूणानं आरोपींवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे समलिंगी संबंधांची मागणी केली. हीच संधी साधत आरोपींनी पीडित तरूणाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा कट आखला. घटनेच्या दिवशी आरोपी पीडित तरूणाच्या घरी गेले आणि त्याच्यावर हत्यारानं वार करत सोन्याची चैन लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.