3 जून 2019 पर्यंत पेन्शन संबधीचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईटवर तक्रार अर्ज उपलब्ध आहेत. धोरणात्मक निर्णय, पदोन्नती किंवा अन्य बाबींसदर्भातल्या तक्रारी यामध्ये घेतल्या जाणार नाहीत.
VIDEO | पैसा झाला मोठा : नॅशनल पेन्शन स्कीमचे बारकावे
तीन जूनपर्यंत ज्या लोकांचे तक्रार अर्ज दाखल होतील केवळ त्यांच्याच तक्रारींचा या पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाईल. तीन जूननंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही, असे पोस्टातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
पेन्शन अदालतमध्ये अर्ज करण्यासाठीचा अर्ज महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईट https://www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.