मुंबई: महापालिका निवडणुकांना अवघे दोन दिवसच उरल्यानं राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. आज मुंबईत सोमय्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. याच ठिकाणी शिवसेनाविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ज्यामध्ये समर्थन आणीबाणीला आणि विरोध कलामांच्या राष्ट्रपतीपदाला असा उल्लेख केला आहे.

या पोस्टरमध्ये शिवसेनेचं नाव न घेता टीका करण्यात आली आहे. ‘ही तर घराणेशाहीची गादी’ असंही या पोस्टरवर छापण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपनं शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

दुसरीकडे आज शिवसेनेची बीकेसी मैदानावर प्रचारसभा होणार आहे. त्यामुळे या सभेत नेमकं काय होणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.



दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरीत सभा घेतली. त्यानंतर रात्री सोमय्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. तर उद्धव ठाकरे आज बीकेसी मैदानात सभा घेतील. राज ठाकरेंची तोफ दादरमध्ये धडाडणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे तीनही प्रमुख नेते आपापल्या होमग्राऊंडवर सभा घेणार आहेत.

खरं तर आज प्रचारासाठी शेवटची संध्याकाळ मिळणार आहे. उद्या पाचनंतर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे सर्वच नेते मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या:

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!

मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार

शरद पवार बेभरवशी : शिवसेना

माझ्या पक्षाचं मी बघून घेईन : राज ठाकरे

शिवसेनासोबत नसती तर खुर्ची बघितली असती का?: उद्धव ठाकरे

मनसेच्या 'त्या' विनंतीकडे शिवसेनेचं दुर्लक्ष