मुंबई : राफेल प्रकरणी आता काँग्रेसनं थेट रिलायन्स समूहाच्या कार्यालयावर पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून मुंबईतल्या सांताक्रुझ विभागातल्या अनिल अंबानींच्या कार्यालयाच्या इमारतीवर पोस्टर लावण्यात आले. ज्यामध्ये राफेल विमानासोबत अनिल अंबानींचा फोटो होता. त्यावर राफेल चोर असं लिहण्यात आलं होतं. या फ्लेक्सवर काँग्रेस पक्षाचाही उल्लेख होता. मात्र याची माहिती कंपनीला मिळतात, हे पोस्टर त्वरित उतरवण्यात आले.


राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मात्र त्यानंतरही काँग्रेसकडून हे प्रकरण लावून धरण्यात आलं आहे.  राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही काँग्रेसकडून हे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणी  चौकशीची मागणी काँग्रेस करीत आहे. तर दुसरीकडे याबाबत अंबानी परिवारालाही यात लक्ष्य करण्यात येत आहे.

मुंबईच्या सांताक्रुझ विभागात असलेल्या रिलायन्सच्या कार्यालयावर अनिल अंबानी यांचे राफेल बाबत विवादास्पद पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर एका बाजूला अनिल अंबानी यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला राफेल विमानाचा फोटो लावण्यात आला होता. यावर राफेल चोर असे ठळक अक्षरात लिहिलेले होते. तसेच या फ्लेक्सवर काँग्रेस पक्षाचा देखील उल्लेख होता. हे पोस्टर काही वेळातच रिलायन्सच्या सुरक्षारक्षकांनी काढले.