मुंबई: शिवसेना आणि भाजपविरोधातला शाब्दिक वाद आता रस्त्यावर आला आहे. कारण शिवसैनिकांनी आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुतळ्याचं दहन केलं. आशिष शेलार हे युतीमधील 'शकुनी मामा' असल्याची घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.


 



 

चर्चगेट रेल्वे स्टेशनजवळ शिवसैनिकांनी भाजपविरोधात हे आंदोलन केलं. यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. पण आता थेट रस्त्यावर शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत.

 

याचबरोबर शिवसैनिकांनी काही पोस्टरही झळकावले. यामध्ये शेलारांना शकुनी मामा म्हटलं आहे. तर अमित शाहा हुकूमशहा गब्बर सिंह असल्याचे पोस्टर तयार करण्यात आले आहेत.

 

संबंधित बातम्या:

भाजप-शिवसेनेतलं पोस्टरवॉर टोकाला, मोदींना नागोबा म्हणून हिणवलं


पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर