VIDEO: मद्यधुंद तरुणीचा पोलीस स्थानकात धिंगाणा, पोलिसांना शिवीगाळ
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 03:42 AM (IST)
मुंबई: वरळी पोलिस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत सहा पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. 16 जूनला ही घटना घडली होती. 16 जूनच्या रात्री पोद्दार रुग्णालयासमोर आपल्या मित्रांसोबत जात असताना या तरुणीची कार दुभाजकाला आदळली. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीतील सर्व जण दारु प्यायले असल्याचं समोर आलं. या सर्वांची पोलिस स्टेशनमध्ये चौकशी करत असताना या तरुणीने जोरजोरात आरडाओरड करत धिंगाणा घालायला सुरुवात केली. इतकंच नाही तर या तरुणीने ड्युटीवर असलेल्या सहा पोलिसांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. यावेळेस काही पोलिसांना तिने चावाही घेतला असल्याचं समजतं आहे.