मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी फक्त राजकारण आणि ट्रोलिंग होतं असे नाही, या माध्यमातून समाजतील अनेक गरजूंना मदत देखील मिळते. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील 'बाबा का ढाबा' मधील एक रडणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या ढाब्याला भेट दिली आणि त्यांचा फायदा झाला.



मुंबईत देखील भेंडी बाजार इथे इस्माईल चाचा यांची पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाली होती. अतिशय स्वाभिमानाने किचेन विकून हे चाचा गुजराण करत आहेत. त्यांना नुसते पैसे नको पण त्यांच्या वस्तू ग्राहकांनी खरेदी कराव्या ही त्यांची इच्छा होती.



ही पोस्ट बघून काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांनी भेंडी बाजार इथे इस्माईल चाचा यांना शोधून काढले आणि त्यांच्याकडच्या सगळ्या किचेन खरेदी केल्या.


'बाबा का ढाबा'मधल्या आजोबांकडे गर्दी
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील 'बाबा का ढाबा' मधील एक आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोरोना काळात या आजोबांचे नुकसान झाले. आता गोष्टी पूर्वपदावर येत आहेत पण त्यांच्या ढाब्यावर लोक येत नसल्याने या वयातही काम करुन गुजराण करत होते. अतिशय दुःखी असलेल्या या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांच्या ढाब्याला भेट दिली आणि त्यांना याचा फायदा झाला


कोरोना काळात अनेक लोकांनाच रोजगार गेला. रस्त्यावर छोट्या मोठ्या गोष्टी विकणाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा काळात ही अनेकजण स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे प्रयत्न करणाऱ्या सामान्य नागरिकांना जितकी जमेल त्यांना मदत करावी हाच वस्तुपाठ या दोन्ही प्रकारणातून मिळत आहे.


Real Story of Delhi's BABA KA DHABHA 'बाबा का ढाबा'च्या व्हिडीओची खरी कहाणी, पाहा सोशल मीडियाची कमाल