मुंबई: जे राजकीय पक्ष हिंसेचं समर्थन करतात आणि ज्यांच्या नावात सेना किंवा फौज आहे, अशा पक्षांची मान्यता रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली.


मिलिंद देवरा यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन ही मागणी केली आहे.

https://twitter.com/milinddeora/status/905349506253824000

ख्यातनाम आणि निर्भिड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने तीव्र दु:ख झालं आहे. त्यांना तातडीने न्याय मिळेल अशी आशा आहे, असं मिलिंद देवरा यांनी काल ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज ट्विट करुन कट्टरतावाद्यांना लक्ष केलं आहे.

https://twitter.com/milinddeora/status/905124935760199680

गौरी लंकेश यांनी उजव्या विचारणीच्या कट्टरतेविरोधात आवाज उठवला होता.

हाच धागा पकडून मिलिंद देवरा यांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी थेट सेना किंवा फौज अशी नावं असलेल्या पक्षांची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली आहे.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदू राष्ट्र सेना, तर कर्नाटकात श्रीराम सेना अशा पक्ष-संघटना आहेत.

गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गींच्या हत्येनंतर देशात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात झाली. बंगळूरमधल्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बंगळुरूतल्या राजराजेश्वरी नगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.

55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास तीन आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.

मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली.

संबंधित बातम्या

गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली? चौकशीसाठी SIT ची स्थापना

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या