भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील वालचंद नगर परिसरात एका  गंभीर गुन्ह्यातील  आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर  आरोपींनी पोलिसांना विरोध केला आणि चक्क  त्यांच्या अंगावर गरम पाणी फेकलं आहे. आज सायंकाळी  साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


भाईंदर पश्चिम येथे गुन्ह्यातील  आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या  सहा पोलिसांवर  आरोपीनी चक्क  अंगावर गरम पाणी फेकल्याच्या घटनेतील त्यावेळचा पोलीस घराबाहेर जावून आरोपींना दरवाजा उघडण्याचं सांगून, ते दरवाजा न उघडल्याने पोलीस आपल्या वरिष्ठांकडे फोन द्वारे त्यांचा अरेरावी पणा बद्दल तक्रार करतानाचा विडिओ एबीपी माझा च्या हाती आला आहे.


आरोपींना अटक करण्यासाठी गेलेले सर्व पोलीस कर्मचारी भाजले आहेत


आरोपींना अटक करण्यासाठी गेलेले सर्व पोलीस कर्मचारी भाजले आहेत. सध्या त्यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणात एकूण 4 आरोपी असून त्यापैकी  अजय चौबे, अभय चौबे, आणि एक महिला अशा तीन  जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता  गायकवाड, किरण पवार, दीपक इथापे, सलमान पटवे, रवींद्र वाघ, विजय सोनी, अमृता माची हे जखमी झाले आहेत.


दरम्यान, दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये अतिरेकी हल्ल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली होती. मात्र तपासात  मध्यप्रदेशातून एका मनोरुग्ण व्यक्तीने हा दूरध्वनी केल्याचे आले समोर आले आहे. मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास या हॉटेलच्या स्वागतकक्षाला हॉटेलवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन आला होता.मुंबई पोलीसांनी संपूर्ण हॉटेल पिंजून काढले. मात्र, काहीही संशयित आढळून आले नाही. 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने तपास सुरू केला. तपासात, मध्यप्रदेशातून फोन  आल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलचे लोकेशन प्राप्त केले असता संबंधित लोकेशन मध्य प्रदेशातील चिंदवारामधील डुंगारियी येथील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मोबाईल क्रमांकधारक मध्य प्रदेश राज्यातील सीतापर ग्राम पंचायत येथील असल्याचे आढळून आले. त्यानुसार स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. स्थानिक पोलिसांना त्याच्या घरी पाठवून चौकशी करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या 


हत्येच्या काही तासांपूर्वी यशश्री गेली होती मैत्रिणीच्या घरी, पोलिसांना सापडला महत्त्वाचा दुवा, अनेक प्रश्नांचा उलगडा होणार?