गर्लफ्रेण्डशी लग्नासाठी पोलिसांचा खबऱ्या झाला सोनसाखळीचोर
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2016 06:36 AM (IST)
मुंबई : गर्लफ्रेण्डसोबत लग्नासाठी पैसे मिळवता यावेत, म्हणून पोलिसांचा खबऱ्यात सोनसाखळीचोर झाल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. पोलिसांनी एका तरुणीसह चौघा सोनसाखळीचोरांना मालाडच्या रेस्टॉरंटमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. धनराज उर्फ बिट्टू या 21 वर्षीय खबऱ्यासह त्याची 26 वर्षीय गर्लफ्रेण्ड पूनम आणि दोन तरुणांना अटक झाली आहे. चौघांवर मुंबईत शिवाजी पार्क, वर्सोवा, समतानगर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. 'मिड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. पोलिस सोनसाखळीचोरांची धरपकड कशी करतात, ही पोलिसांच्या तपासाची पद्धत लक्षात घेऊन बिट्टू चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. दागिने विकून खाणंपिणं, कपडे आणि ड्रग्जवर हा पैसा उधळला जात असे.