एकूण 1057 मतांपैकी विजय रवींद्र फाटक यांना 601 मतं मिळाली, तर डावखरेंच्या खात्यात 450 मतं जमा झाली. त्यामुळे रवींद्र फाटकांनी 151 मतांनी विजय मिळवत भगवा फडकवला. 6 मतं बाद ठरली.
वसंत डावखरे हे गेल्या तीन टर्म या मतदार संघांतून निवडून येत होते. मात्र यंदा त्यांना गड राखण्यात अपयश आलं.
ठाणे विधानपरिषद निवडणूक : र500 मतांच्या पहिल्या फेरीत- डावखरे 189, रवींद्र फाटक 311 (अंतिम निकाल येणं बाकी)
राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंसमोर यंदा शिवसेना-भाजपने रवींद्र फाटकांना रिंगणात उतरवलं होतं. संख्याबळानुसार शिवसेना-भाजपकडे सर्वाधिक मतं असली तरीही दोन्ही उमेदवारांचं भवितव्य हे अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होतं. त्यातच हितेंद्र ठाकूरांनी आपल्या बहुजन विकास आघाडीची मतं डावखरेंच्या पारड्यात टाकल्याने रवींद्र फाटकांसमोर आव्हान वाढताना दिसतं होतं.
ठाणे महापालिकेतील सर्वच मतदारांनी हक्क बजावला तर कल्याणमध्येही 100 टक्के मतदान झालं. ठाणे विधानपरिषदेठी 99.72 % मतदान झालं आहे. एकूण 1060 मतदारांपैकी 1057 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 519 पुरुष मतदारांनी तर 538 महिला मतदारांनी मतदान केलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडलं.
एकदा शब्द दिला म्हणजे दिला, आमची सर्व मतं डावखरेंनाच : हितेंद्र ठाकूर
राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी आव्हान दिल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. भाजपने रवींद्र फाटक यांना पाठिंबा दिला आहे. तर वसंत डावखरेंना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे.
हितेंद्र ठाकूर यांचा डावखरेंंना पाठिंबा, सेना-भाजपची धावाधाव
मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तसंच दगाफटका टाळण्यासाठी दोन्ही पक्षातले नेते आपापल्या नगरसेवकांची विशेष काळजी घेताना दिसत होते.