ही स्टंटगर्ल सोमवारी लोकलच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करत होती. यावेळी ती हात निसटून लोकलच्या खाली पडत असताना सहप्रवाशांनी तिला वाचवलं. धक्कादायक बाब म्हणजे इतकं सगळं होऊनही तिची मुजोरी मात्र कायम असल्याचं समोर आलं होतं. या सगळ्यानंतर अखेर रेल्वे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

सध्या स्टंटगर्ल फरार असून तिचा फोनही बंद आहे. रेल्वे पोलिसांकडून तिचा कसून शोध सुरु आहे.
दरम्यान, या मुलीवर दोन वर्षांपूर्वी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. त्यात ती बालसुधारगृहातही होती. मात्र तिथून ती पळून गेली आणि दिव्यात येऊन लपली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांसोबत मुंबई पोलीसही तिच्या मागावर असल्याचं समजतंय.
व्हिडीओ :