मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा प्रमुख आरोपी आणि हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदीविरुद्ध भारतासह चार देशांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची 637 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता, दागिने आणि बँक खात्यांचा समावेश आहे.


प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत ईडीने नीरव मोदीची अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सुमारे 216 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त केली आहे. भारतासह हाँगकाँग, अमेरिका, ब्रिटन आणि स्वित्झर्लंड या चार देशांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच 22.69 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिनेही परत आणले जाणार आहेत.

दागिन्यांचा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रीच कँडी शाखेत सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. घोटाळ्याचा पर्दापाश होण्याआधी हे दोघे जानेवारी महिन्यात देश सोडून फरार झाले.

नीरव मोदीच्या कोणत्या संपत्तीवर जप्ती?

न्यूयॉर्क शहरातील 216 कोटींची संपत्ती

लंडनच्या मॅरेथॉन हाऊसमधला 57 कोटींचा फ्लॅट, बहिण पूर्वी मोदीच्या नावाने खरेदी

सिंगापूरमधलं नीरवची बहिण आणि मेव्हण्याचं  बँक खातं सील, खात्यात 44 कोटी

दक्षिण मुंबईतला पूर्वी मोदीचा 19 कोटींचा प्लॅट