त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक उड्डाण पुलाखालून वळविण्यात आली आहे. परिणामी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
टँकरच्या मागील बाजूस वाहनाने धडक दिल्याने गॅस भरण्याचे झाकण तुटल्याने गॅस गळती झाली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या गॅसगळती थांबली आहे. पण वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरु आहे.
बाहेर गावावरुन मुंबईत सकाळी येणाऱ्या वाहनांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आधीच सकाळी सकाळी वाहतूक रखडत असते. त्यातच सानपाडा उड्डाणपूल बंद करुन, वाहतूक खालून वळवल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.