'मोदींना सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात हव्यात', संजय राऊतांचा गौप्यस्फोट
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2017 08:26 AM (IST)
‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन.’’
मुंबई : ‘पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात हव्या आहेत.’ असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांच्याशी झालेल्या गप्पांदरम्यान पवारांनीच याबाबतची माहिती आपल्याला दिली, असा दावा संजय राऊत त्यांनी दैनिक सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे. मात्र, राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार या निव्वळ अफवा आहेत, असं देखील पवारांनी आवर्जून म्हटल्याचं राऊत यांनी नमूद केलं आहे. संजय राऊत यांचा नेमका दावा काय? संजय राऊत यांच्या या थेट दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.