मुंबई : टोल चुकवायचा म्हणून चालकानं चक्क टोलवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यावरच धारधार चाकूनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.


मुंबईतील वरळी सी-लिंकवर काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. टोल तोडून जात असल्यानं इनोव्हा कारला थांबवण्यात आलं, मात्र टोल चुकवण्याच्या हेतूनं चालकानं अमोल चौहान या उपस्थित कर्मचाऱ्यावर चाकूनं हल्ला केला.

यात कर्मचारी जखमी झाला असून लीलावतीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर इनोव्हाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.