फेरीवाल्यांना शिवीगाळ, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2017 03:04 PM (IST)
भाजपा आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत साटम पोलीस आणि फेरीवाल्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत.
मुंबई : भाजपा आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत साटम पोलीस आणि फेरीवाल्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. जुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण करत असल्याचा आरोप अमित साटम यांचा आहे. फेरीवाल्यांनी मात्र अमित साटम आपल्याकडून हप्त्यांची मागणी करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. विशेष म्हणजे, साटम यांनी यावेळी पोलिसांनाही नाकर्ते ठरवत शिवीगाळ केली. ही संपूर्ण घटना 7 सप्टेंबर रोजी घडलेली आहे. दरम्यान, अद्याप याप्रकरणी कुठलाही गुन्हा दखल झालेला नसला, तरी साटम यांच्या अर्वाच्च भाषेतली शिवीगाळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहा