PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरावर (Mumbai Visit) येणार आहेत.  मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीमध्ये बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया (AL JAMAIA TUS SAIFIYA) या विद्यापीठाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींचा 10 फेब्रुवारी मुंबई दौरा आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आजपासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी देखील या ठिकाणी तब्बल चार तास पाहणी केली.


अंधेरी पूर्वेत मरोळ भागामध्ये बोरी कॉलनी परिसर आहे. या परिसरात राहणाऱ्या बोरी मुस्लीम समाजाची संख्या मोठी आहे. इथला परिसराच्या आजूबाजूला मोठी झोपडपट्टी आहे. त्यामुळे पोलिसांसमोर सुरक्षेचं मोठं आव्हान आहे. परिणामी पोलिसांनी दहा ते बारा दिवस आधीच सुरक्षेची तयारी करत आहेत. आतापासूनच इथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


पोलीस आयुक्तांकडून तब्बल चार तास सुरक्षेची पाहणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे. तर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी काल (29 जानेवारी) दुपारी बोरी कॉलनीमध्ये तब्बल चार तास सुरक्षेची पाहणी केली होते. तर आज सकाळी पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 च्या डीसीपी महेश्वर रेड्डी आणि स्थानिक मुंबई महानगरपालिका के/ईस्ट वॉर्डचे अधिकारी मनीष वाळुंजू हे देखील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाचा आढावा घेत आहेत.


पंतप्रधान वंदे भारला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता


सीएसएमटी साईनगर शिर्डी आणि सोलापूर सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी इथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. राज्यांतर्गत वंदे भारत एक्सप्रेस असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल. मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर कॅपिटल दरम्यान पहिली धावणारी ही मुंबईतून चालणारी तिसरी वंदे भारत असेल. मुंबईतून धावणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. मुंबई सेंट्रल-गांधीनगर ही मुंबईतील सुटणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस होती.


महिनाभरात मोदींचा दुसरा मुंबई दौरा


दरम्यान, महिनाभरातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा दौरा असेल. 19 जानेवारी रोजी मोदी मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी मुंबईत आले होते. पंतप्रधानांनी मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 लाईनचे उद्घाटन केलं होतं.