विरार : ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची विरारमधील बिल्डरकडून फसवणूक झाल्याच उघड झालं आहे. विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात त्यांनी दोन प्लॅट खरेदी केले होते. मात्र बिल्डरने एकच प्लॅट अनुराधा पौडवाल यांच्यास दोन ते तीन जणांना विकून फसवणूक केली आहे.
अविनाश डोले, राजीव सुलेरी यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदाराने ही फसवणूक केली आहे. या बिल्डर्सनी मंदार असोसिएट नावाने कंपनी स्थापन करुन, ग्राहकांना प्लॅट विकले होते. आतापर्यंत या कंपनीने नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. याबाबत विरारमधील अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात आपलीही फसवणूक झाल्याची तक्रार अनुराधा पौडवाल यांनी काल (24 सप्टेंबर) अर्नाळा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर अनुराधा पौडवाल यांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. या कंपनीने जर आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.