| आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक | नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक |
| 8 | 1 |
| 7 | 2 |
| 1 | 3 |
| 2 | 4 |
| 3 | 5 |
| 4 | 6 |
| 5 | 7 |
| 6 | 8 |
| 6A | 9 |
| 6A (Home) | 10 |
बोरीवली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबरमध्ये आजपासून बदल
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2017 12:24 PM (IST)
मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यात आले आहेत. आजपासून हा बदल असेल. बोरीवली स्टेशन पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाचं स्थानक आहे, तसंच बोरीवली स्थानकामधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. बोरीवली स्थानकातील प्लॅटफॉर्मची रचना आता सुटसुटीत करण्यात आली आहेत. प्लॅटफॉर्म 8 आणि 7 हे प्लॅटफॉर्म 1 च्या अगोदर होते. आता आठवा प्लॅटफॉर्म पहिला असेल, तर सातवा प्लॅटफॉर्म दुसऱ्या क्रमांकानं ओळखला जाईल. प्लॅटफॉर्मचे क्रमांक केवळ सुटसुटीतपणा आणण्यासाठी बदलण्यात आले आहेत, मात्र लोकल्स त्यांच्या ठरलेल्या प्लॅटफॉर्मवरुनच रवाना होतील. याआधी पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकाचेही प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यात आले आहेत. बोरीवली स्टेशनवरील बदललेले प्लॅटफॉर्म