मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेकांना बेड,ऑक्सिजन ते प्लाझ्माची गरज भासत आहे.  सध्या कोरोनाच्या या काळात कोणत्याही मदतीसाठी सोशल मीडियावर सध्या एकच नावाला पसंती आहे ती म्हणजे युवा काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास. 


दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण यांना प्लाझ्माची गरज आहे, याबाबत मदत करावी असं ट्वीट श्रीनिवास यांनी केलं. शेष नारायण यांना AB positive प्लाझ्मा लागणार होता. रात्री नऊ वाजता प्लाझ्मासाठी युवा काँग्रेसमध्ये मेसेज देण्यात आला. दिल्लीत या रक्तगताचा प्लाझ्माउपलब्ध होत नव्हता..महाराष्ट्र युवा काँग्रेसने देखील शोधाशोध सुरुवात केली. आणि नवी मुंबईतील अमित सावंत हे AB positive प्लाझ्मा दान करायला पुढे आले.


महाराष्ट्र युवा काँग्रेसने अमित सावंत यांचे दिल्लीचे सकाळी सातच्या विमानाची तिकीट तयार केले. अमित सावंत हे मुंबईहून दिल्लीला गेले. नोएडा येथील रुग्णालयात त्यांनी प्लाझ्मा दान केले आणि संध्याकाळी परत मुंबईत आले. 


अमित हे मायक्रोसॉफ्ट कंपनीत सेल्स विभागात काम करतात. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. महाराष्ट्र युवा काँग्रेसने समन्वय साधून रात्री नऊच्या सुमारास प्लाझ्मा मागणी झाल्यावर अवघ्या काही तासात ज्येष्ठ पत्रकार यांच्यासाठी प्लाझ्माची सोय केली.


दिल्लीतील एका रुग्णासाठी थेट दिल्लीत जाऊन प्लाझ्मा दान करून अमित सावंत यांनी सगळ्यांपुढे याची किती गरज आहे. याने जीव वाचवलं जाऊ शकतो हे उदाहरण समोर मांडलं आहे.तसेच अडचणीच्या काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी  एक पक्षाची युवा टीम समन्वयाने किती उत्तम काम करू शकते हे ही या उदाहरणावरून दिसते.