फोटोग्राफर कमलाकर कुबल यांच्यावर सिक्युरीटी गार्डच्या नोकरीची वेळ

कमलाकर तुकाराम कुबल हे मुंबईतील कांजुरमार्गच्या इंदिरानगर भागात राहतात. प्राणी-पक्ष्यांसह किटकांचे फोटो काढण्यासाठीही ते ओळखले जातात.

Continues below advertisement
मुंबई : कधीकाळी अमिताभ बच्चन यांच्यापासून अगदी सलमान खानपर्यंत सगळ्यांनीच ज्यांच्या फोटोग्राफीचे भरभरुन कौतुक केले, ते प्रसिद्ध फोटोग्राफर कमलाकर कुबल सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी कुबल यांना सध्या सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागते आहे.
कमलाकर कुबल हे आता 57 वर्षांचे आहेत. राज्य तसेच देशपातळीवर त्यांच्या फोटोग्राफीचे कौतुक झाले आहे. त्यांच्या फोटोंची स्तुती केली गेली. अनेक पारितोषिकं आणि पुरस्कारही मिळाले. मात्र आता घर चालवण्यासाठी त्यांना आर्थिक चणचण आहे.
राज्य पातळीवरील पुरस्कार मिळालेले फोटो आणि त्यांचे अधिकार कुबल यांनी  विकण्यास ठेवले आहेत. कारण यातून त्यांना स्वत:चा स्टुडिओ उभारायचा आहे, शिवाय कुटुंबाचा गाडाही हाकायचा आहे. सध्या ते सुरक्षारक्षकाची नोकरी करुन दिवस ढकलत आहेत.
कमलाकर तुकाराम कुबल हे मुंबईतील कांजुरमार्गच्या इंदिरानगर भागात राहतात. प्राणी-पक्ष्यांसह किटकांचे फोटो काढण्यासाठीही ते ओळखले जातात. बातमीचा व्हिडीओ :
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola