मुंबई : देशातील पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेतला आहे. येत्या 13 ऑक्टोबरला देशभरातील पेट्रोल पंप चालक संपावर जाणार होते. पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी, तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष याविरोधात देशातील पेट्रोल पंपचालकांनी हा संप पुकारला होता. मात्र अखेर संप मागे घेण्यात आला आहे. डीलर्सच्या मागण्या काय?
  • 4 नोव्हेंबर 2016 चा ऑईल कंपनी बरोबर झालेला पण न पाळलेला करार
  • मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज
  • कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन
  • रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान
  • राज्यानुसार बदलणारे दर जे की GST मध्ये इंधन आणल्यास स्वस्त आणि समान होतील
संबंधित बातम्या : 13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालकांचा एकदिवसीय संप गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल जवळपास 3 रुपयांनी स्वस्त!