राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोल 92 रुपये, तर डिझेल 80 रुपयांवर
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2018 08:17 AM (IST)
राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये आहे. इथे पेट्रोल 93.32 रुपये, तर डिझेल 80.44 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई : पेट्रोल आज 22 पैशांनी, तर डिझेल 18 पैशांनी वाढलं आहे. राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर 90.57 रुपये, तर डिझेल 79.01 रुपये प्रति लिटर आहे. राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये आहे. इथे पेट्रोल 93.32 रुपये, तर डिझेल 80.44 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोलची शतकाकडे वाटचाल सुरुच आहे, पण सरकारी पातळीवर दरवाढ रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्यात देशातलं सर्वात महाग पेट्रोल मिळत आहे. डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढत आहे, ज्याचा परिणाम महागाईवर होतोय. कोणत्या जिल्ह्यात काय दर? मराठवाडा जिल्हा पेट्रोल दर डिझेल दर (प्रति लिटर) औरंगाबाद 91.62 80.06 बीड 91.31 78.52 हिंगोली 91.34 78.57 जालना 91.38 78.58 लातूर 91.26 78.49 नांदेड 92.14 79.33 उस्मानाबाद 90.96 78.19 परभणी 92.31 79.48 पश्चिम महाराष्ट्र अहमदनगर 90.39 77.64 कोल्हापूर 90.73 77.97 पुणे 91.50 78.71 सांगली 90.46 77.72 सातारा 91.05 78.25 सोलापूर 91.62 79.63 विदर्भ अकोला 90.57 77.83 अमरावती 91.82 80.29 भंडारा 91.30 78.53 बुलडाणा 91.20 78.47 चंद्रपूर 90.55 77.82 गडचिरोली 90.79 78.11 गोंदिया 91.28 78.53 नागपूर 91.05 79.53 वर्धा 90.76 78.00 वाशिम 91.06 78.29 यवतमाळ 91.57 78.79 कोकण सिंधुदुर्ग 91.46 78.68 रायगड 90.59 77.79 रत्नागिरी 91.57 78.79 मुंबई महानगर क्षेत्र पालघर 90.71 77.91 मुंबई उपनगर 90.64 79.08 मुंबई शहर 90.57 79.08 ठाणे 90.66 79.09 उत्तर महाराष्ट्र धुळे 90.48 77.72 जळगाव 91.52 78.71 नंदुरबार 91.35 78.56 नाशिक 90.93 78.14