मुंबई : एकीकडे मुंबई पोलीस आयुक्तांना मुदतवाढ मिळालेली असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईत पाच वर्षांपूर्वी झालेल्या दोन सदनिकांच्या खरेदी व्यवहाराबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर थेट आरोप करत हायकोर्टात याचिका सादर झाली आहे. या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला देत यावर 4 सप्टेंबरला सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली होती.
बांधकाम व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी यांनी हायकोर्टात फौजदारी याचिका केली आहे. जोगेश्वरीतील मजासवाडी येथील दोन फ्लॅटच्या खरेदीबाबत याचिकाकर्ते आणि बर्वे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले आहेत. सदर सदनिकांची नोंदणीही बर्वे यांच्याच नावावर करण्यात आली आहे. मात्र काही महिन्यापूर्वी संबंधित सदनिका विकण्याबाबत बर्वे यांनी तयारी दर्शवली. या व्यवहाराबाबत त्यांच्याकडून आपल्यावर दबाव येत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने माहिती घेऊन खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्र्यांनाही याबाबत निवेदन दिले आहे, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच पेन ड्राईव्हमार्फत काही संभाषणाचे तपशीलही न्यायालयात सादर केले आहेत.
घरखरेदी व्यवहाराबाबत पोलीस आयुक्त बर्वेंकडून दबाव आणि धमक्या आल्याचा आरोप, हायकोर्टात याचिका
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
27 Aug 2019 11:33 PM (IST)
एकीकडे मुंबई पोलीस आयुक्तांना मुदतवाढ मिळालेली असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -