मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मंदिरात 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर हे यासाठी पाठपुरावा करत होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक मंदिराच्या कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला आहे.


गेल्या वर्षभरापासून आदेश बांदेकर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासांनी शासनाला पाठवलेला आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील एकूण 133 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सिद्धिविनायक कर्मचाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची आभार मानले आहेत.


जुलै 2017मध्ये आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय शिवसेनेने बांदेकर यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारीही दिली आहे.