याशिवाय आई-वडील, 2 मुलं अशा पूर्ण कुटुंबासाठी 100 रुपये आणि 12 वर्षांखालील मुलांसाठी 25 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी बीएमसीनं राणीच्या बागेत पेंग्विन आणले, त्यावेळी पेंग्विन दर्शनाचे दर निश्चित केलेले नव्हते. अखेर पालिकेनं बैठक घेऊन पेंग्विन दर्शनाच्या शुल्कात वाढ केली. ती शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे. या वाढीवर मुंबईकरांकडून मात्र टीका होत आहे.