नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच रोडवर तरुणीचा मृतदेह सापडला. तलावाच्या शेजारी एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.


मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचं वय अंदाजे 26 ते 27 वर्षांच्या आसपास असल्याचं कळतं. मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिस घटनास्थळी पोहोचले झाले असून मृत तरुणीचं नाव काय, ती कुठे राहते याचा तपास सुरु आहे. याप्रकरणी सीवूडमधील एनआरआय पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.