'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा...' विधानसभेत जयंत पाटलांचे टोले
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2017 03:39 PM (IST)
जयंत पाटील यांनी सोनूच्या गाण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला टोमणे मारले आहेत. 'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?' अशी सुरुवात करत 'देवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल' असं म्हणत जयंत पाटलांनी सेना-भाजपवर वार केले.
मुंबई : 'सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?' या गाण्याने गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सामान्य तरुणांपासून सेलिब्रेटी आणि आरजे मलिष्कापासून पाकिस्तानी नागरिकांपर्यंत अनेकांच्या तोंडून व्हायरल झालेलं हे गाणं आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही गाजत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोनूच्या गाण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला टोमणे मारले आहेत. 'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?' अशी सुरुवात करत 'देवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल' असं म्हणत जयंत पाटलांनी सेना-भाजपवर वार केले. जयंत पाटील यांनी विधानसभेत ऐकवलेलं गाणं :लाचार सत्तेसाठी झोल झोल - झोल झोलजनतेचा वाजतोय ढोल ढोल - ढोल ढोलदेवेंद्र वाघाला फिरवतोय - गोल गोलसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?सेनेला दिलाय गाजर गाजरगाजराचा आकार कसा लांब लांब - लांब लांबदेवेंद्र, तुझ्या कामास म्हणतोथांब थांब - थांब थांबसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?सेनेचा इथे सभेत नखरा नखरावाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी)देवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोलसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?देवा, सेनेवर अपमानी घाव खोल खोल - खोल खोलसत्तेत राहुन त्यांचा शून्य रोल - शून्य रोलदेवेंद्र, कधी तरी खरं बोल - खरं बोलतुझा सेनेवर भरोसा नाय ना नाय ना?.सेनेचं भांडं आता खोल खोल - खोल खोलआता तरी त्यांची साथ सोड - साथ सोडसत्तेचं नाही काही मोल मोल - मोल मोलदेवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोलपाहा व्हिडिओ :