CM Eknath Shinde On Sanjay Rautशिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. राऊतांची चौकशी सुरु आहे. मात्र ज्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे, ते सगळे प्रकरण काय आहे हे समजून घेऊ. हे सगळे प्रकरण हे वाधवान बंधूंची निगडीत आहे. वाधवान बंधू सीबीआय, ईडी, महाराष्ट्र पोलिसांना सापडत नव्हते. तेव्हा वाधवान संदर्भातील पहिली बातमी एबीपी माझाने 2020 मध्ये सर्वात आधी दाखवली होती. वाधवान बंधूंना तेव्हाच्या गृह सचिवांनी खास पत्र देऊन महाबळेश्वरला संपूर्ण देश लॅाकडाऊनमध्ये असताना नेऊन सोडण्याची खास व्यवस्था केली होती. तेच गृहसचिव अमिताभ गुप्ता सध्या पुण्याचे पोलिस आयुक्त आहेत. 


सुरूवात कशी झाली…..


मुंबईत गोरेगाव येथे पत्रावाला चाळ आहे. हे या पत्रावाला चाळीच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम 2010 साली हाती घेण्यात आला. राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि संजय राऊत यांचे जवळचे मित्र प्रवीण राऊत यांच्या गुरुअशिष कंन्स्ट्रक्शन कंपनीसोबत पत्रावाला चाळ सोसायटी, म्हाडा आणि गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनी असा तीन पार्टी करार झाला. या करारानुसार पत्रावाला चाळीत असलेल्या जागेवरती बांधकाम करायचे होते. त्यातले 3 हजार फ्लॅट महाडाला द्यचे होते. 672 फ्लॅट हे मूळच्या रहिवाशांना द्यायचे होते. उर्वरीत जागा गुरूआशिष कंपनी विकणार होती.


घोटाळा कसा झाला


परंतु ते काम पूर्ण न करताच म्हाडाला चुकीची माहिती देऊन गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांना मिळालेला पत्रावाला चाळचा एफएसआय 9 इतर जणांना विकला. त्यातून गुरु अशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला 901 कोटी 79 लाख रुपये मिळाले. म्हाडाला जे फ्लॅट मिळणे अपेक्षित होतं ते मिळाले नाहीत. याउपर गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने एका नव्या प्रकल्पाची त्याच जागेवर घोषणा केली. त्या प्रकल्पातल्या फ्लॅटच्या बुकींग व्दारे 138 कोटी रुपये मिळवले. असा एकूण एक हजार 39 कोटी 79 लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मुंबई पोलिसांकडे दाखल केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागानं या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर याच्या मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 2018 साली प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली..


ईडीची एन्ट्री…


या सगळ्या दरम्यान वाधवान बंधूनी प्रवीण राऊतच्या खात्यावरती शंभर कोटी रुपये वळवल्याचे दिसून आले. अशा पद्धतीने पैशांची वेगवेगळ्या खात्यात हेराफेरी झाल्याचं लक्षात आल्यावर ईडीकडे हा तपास दाखल करण्यात आला. या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावरती 83 लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले. या 83 लाख रुपयातून वर्षा राऊत यांनी दादर येथे एक फ्लॅट विकत घेतला. याशिवाय स्वप्ना पाटकर, सुजीत पाटकर, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांनी अलिबाग येथे नऊ प्लॉट विकत घेतल्याचे डीडीच्या तपासात उघड झाले. ही चौकशी सुरू असतानाच वर्षा संजय राऊत यांनी 55 लाख रुपये परत खात्यावरती वर्ग केले. माधुरी राऊत यांच्याकडे मिळालेले 83 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. 


प्रवीण राऊतला पुन्हा अटक…


 दरम्यान पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 या दिवशी प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. सध्या प्रवीण राऊत ईडीच्या कस्टडी आहेत. या संपूर्ण तपासामध्ये काही पैसे एचडीआयएल या खात्यातून प्रवीण राऊत यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आल्याचे उघड झाले आहे. प्रवीण राऊत यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या खात्यावर यातले काही पैसे वर्ग केले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून 'या' प्रकरणात गुन्हा दाखल होणार?


ED Raids On Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर ईडीकडून अटकेची टांगती तलवार


Sanjay Raut : संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री एकाच वाक्यात म्हणाले, मोठी कारवाई करायचीय पण... 


Sanjay Raut ED : ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र; काँग्रेसचा गंभीर आरोप, काँग्रेस राऊतांच्या पाठिशी