वसई: केवळ दहा रुपयांसाठी प्रवाशानं रिक्षाचालकावर चाकूनं हल्ला केल्याची घटना वसईत घडली आहे. प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये 100 रुपये इतकं भाडं ठरलं होतं. मात्र, रिक्षातून उतरल्यानंतर धनाजी राठोडनं या प्रवाशानं रिक्षा चालकाला 90 रुपये दिले. दहा रुपयांवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून प्रवाशानं रिक्षाचालकाच्या गळ्यावर चाकूनं वार केले.

 

नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत रिक्षाचालकाला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि धनाजी राठोड या आरोपीलाही पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

मिलिंद खैरे असं रिक्षा चालकाचं नाव असून त्याच्यावर विरारमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिक्षाचालक दहा रुपये कमी करण्यास तयार नव्हता. एवढयाशा गोष्टीवरून धनाजीने रिक्षाचालकाच्या गळ्यावर वार केले. सध्या मिलिंदची प्रकृती स्थिर आहे. प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विरार पोलिसांनी धनाजीला अटक करून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.