मुंबई : ‘कोरोना कोविड 19' या संसर्गजन्य आजाराच्या बाधितांचे प्रमाण महापालिकेच्या काही विभागांच्या क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये अर्थात सोसायटींमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोसायटींच्या स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजन विषयींचे नियोजन व अंमलबजावणी यात संबंधित सोसायटींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना सदर कामात सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.


बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील सहकारी गृहनिर्माण संस्थाविषयक संबंधित उपनिबंधक देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे आजच्या बैठकीदरम्यान आवर्जून नमूद केले आहे.

नवी मुंबईत चमकोगिरी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून कोरोना स्क्रीनिंगमध्ये लुडबुड!

'कोविड कोरोना 19' या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत आहे. यामध्ये नागरिकांद्वारे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची परिणामकारकता अत्यंत महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रभावी जाणीवजागृती करीता नियमितपणे प्रयत्न करण्यात येत असून यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याच श्रृंखलेत आता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करुन घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना आज दिले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
राज्यात आज 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5751 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 67, भिवंडी 27, ठाणे 4, वसई विरार 1, नागपूर मनपा येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

Social Distancing in Mumbai, Thane | मुंबईकर आणि ठाणेकरांकडून रेल्वे स्थानकांवर शिस्तीचं पालन